पत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट

सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 14, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, सौदी अरेबिया
सौदी अरेबिया देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.
देशाच्या पूर्वेकडील प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीनं कार चालवतांनाचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर त्याला पाठवला. पत्नी आपल्या नवऱ्याला सरप्राईज देणार होती. मात्र यामुळं नवरा नाराज झाला.
गल्फ न्यूज चॅनेलनुसार तो नवरा याकरता नाराज झाला कारण त्याच्या पत्नीनं हा निर्णय त्याला न सांगता घेतला. तो म्हणाला त्याच्या पत्नीनं कायदा आणि सामाजिक परंपरा दोन्हीचं उल्लंघन केलंय. व्यक्तीनं न्यायाधिशांना सांगितलं की त्यानं तो व्हिडिओ पाहून आपल्या पत्नीला मारहाण केली नाही तर तिला फक्त घरातून जाण्यास सांगितलं आणि घटस्फोटाचे कागद तयार होईपर्यंत तिच्या माहेरीच राहण्यास सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.