काठमांडू : दिवसेंदिवस नेपाळमधील अनेक मोठ मोठ्या घटना समोर येत आहेत, नेपाळमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप होता. नेपाळमध्ये आतापर्यंत ४ हजार ३४७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येतेय, हा आकडा १० हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता देखिल व्यक्त केली जात आहे.
युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार १० लाख लोक या घटनेने प्रभावित झाले आहेत.
नेपाळच्या राजधानीपासून दूर असलेल्या बरपक गावात एकूण १२०० घरं होती, त्यापैकी फक्त ४ घरं वाचले आहेत. उरलेल्या सर्व घरांची भूकंपात पडझड झाली आहे. या गावापर्यंत पोहोचणं एक आव्हान आहे. यामुळे या गावापर्यंत अजून पुरेशी मदत पोहोचलेली नाही.
भूकंपात बरपक गावातील आतापर्यंत ७०० लोकांची मृत्यू झाला आहे. या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आता नेपाळच्या लष्कराने हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे.
हे बरपक गाव हे सैनिकाचं गाव आहे, या गावाने नेहमीच गोरखा रेजीमेंटची शान वाढवली आहे. या गावापर्यंत जाण्यासाठी पायी आठ तास चालावं लागतं. या गावापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण असल्याचंही नेपाळचे अधिकारी सांगतात.
या गावातील प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्ती हे लष्करात आहेत, हे गोरखा लोकांचं गाव आहे, या गावात प्रत्येक घरात असे लोक राहतात, ज्यांना ब्रिटिश लष्कर, नेपाळ लष्कर, भारतीय लष्करात आपली सेवा दिली आहे. ब्रिटीश लष्करात काम करणाऱ्यांची घरं जरा अत्याधुनिक आहेत. या गावात महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. रविवार पर्यंत नेपाळच्या लष्कराने या गावातील १२० लोकांना वाचवलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.