जकार्ता : टेलिशॉपिंगच्या जाहिरातीत किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातीत आपल्याला एखादी वस्तू घेतल्यास फ्री वस्तू मिळते. या फ्री वस्तूसाठी आपण कधीकधी ती मूळ वस्तू खरेदी करतो. पण
इंडोनेशियामधील एक घराची विक्री करण्यासाठी या घराच्या मालकीणीने टाकलेली जाहिरात सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या जाहिरातीत ते घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला बायको फ्री मिळणार आहे.
इंडोनिशियात राहणाऱ्या वीना लिया यांनी ही जाहिरात दिली आहे. घर खरेदी करणाऱ्यासोबत चक्क लग्न करण्याचा प्रस्ताव वीना यांनी ठेवला आहे. इंटरनेटवर टाकलेली ही जाहिरात नेहमीच्या जाहिरातीप्रमाणे आहे. यात टूबीएचके जागा असलेल्या घराच्या किमतीत पार्किंग स्पेस आणि एका फिश पॉन्डचाही समावेश आहे. मात्र खास आकर्षण अशा मथळ्याखाली महिलेने खरेदीदारासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
जाहिरातीत वीना यांनी आपला फोटोही दिला आहे. वीना या ४० वर्षांच्या विधवा आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.