हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन खेळाडूंचा दुर्दैवी अंत

एका हेलिकॉप्टर अपघातात तीन ऑलिम्पिक क्रिडापटूंसह अन्य 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण खेळविश्वात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. एका रिऍलिटी शोच्या दरम्यान हा अपघात झाला. 

Updated: Mar 11, 2015, 04:33 PM IST
हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन खेळाडूंचा दुर्दैवी अंत

अर्जेंटिना : एका हेलिकॉप्टर अपघातात तीन ऑलिम्पिक क्रिडापटूंसह अन्य 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण खेळविश्वात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. एका रिऍलिटी शोच्या दरम्यान हा अपघात झाला. 

मृत खेळाडूंमध्ये जलतरणपटू कॅमिली मुफ्फत, बॉक्सर अलेक्‍झिक वॅस्टीन आणि नौकायनपटू फ्लोरान्स अर्थोड यांच्यासह 10 जणांचा हेलिकॅप्टरच्या अपघातात मृत्यु झाला आहे. दोन हेलिकॅप्टरची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. "ही घटना दु:खद असुन आम्ही या खेळाडूंच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत" असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी म्हटले आहे.