ऑस्ट्रेलियाकडून भारताचा अवमान, PM समोर चुकीचा नकाशा

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.  

Updated: Nov 14, 2014, 07:51 PM IST
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा अवमान, PM समोर चुकीचा नकाशा title=

क्वीन्सलँड : ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.  

क्वीन्सलँड विद्यापीठात मोदींसमोर मांडलेल्या प्रेझेंटेशनमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीर वगळण्यात आले.

आता यावर मोदींनी अजून प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. मोदी  काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
पंतप्रधान  मोदी  जी २० संमेलनासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.

यानंतर मोदींनी क्वीन्सलँड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठात मोदींसमोर प्रेझेंटेशनही देण्यात आले.
या प्रेझेंटेशनमध्ये भारताचा विवादास्पद नकाशा दाखवण्यात आला. ही एक प्रकारची अपमानास्पद बाब आहे. यावर आयोजक आणि मोदी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.