लंडन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना, भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं अशा रोखठोक शब्दांत ठणकावत त्यांनी लंडनचं मैदान मारलं.
नरेंद्र मोदींनी वेम्ले स्टियममध्ये भाषण सुरु होण्यापूर्वी जवळपास ६०० भारतीय आणि लंडनमधील कराकारांनी काही परफॉमन्स सादर केले. मराठमोळ्या ढोल ताशांपासून ते राजस्थानी नृत्याची झलकही यावेळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी भारत आणि इंग्लंडच्या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या काही परफॉम्सनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. यामध्ये मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर मोदींचं भाषण झाल्यानंतर आकाशात मोठ्याप्रमाणावर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनीही जमलेल्या अनिवासी भारतीयांश संवाद साधला. केम छो वेम्बले म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. लवकरच भारतात अच्छे दिन येणार आहेत. तसंच ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान होण्याचा दिवस दूर नाही असंही त्यांनी म्हटल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ब्रिटन दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बंकिंगहम पॅलेसमध्ये शाही भोजनाचा अस्वादही घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मोदींनी ५४ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या भारत दौऱ्यातील काही निवडक छायाचित्रे भेट म्हणूनही दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.