दोहा: एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला.
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या वेलियानकोड इथले राहणारे प्रमोद शेरायिल कतारची राजधानी दोहामध्ये मादिनाम खलिफा नार्थ कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. त्यांच्या एका मित्रानं ही माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळतांना प्रमोद जेव्हा क्षेत्ररक्षण करत होते तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये नेतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
गल्फ टाइम्सनं प्रमोदच्या मित्राकडून ही माहिती दिली. दु:खद म्हणजे प्रमोद यांचं निधन त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी होईल. याच वर्षी त्यांना एक गोंडस मुल झालं होतं आणि आपल्या बाळाला पाहून दोन महिन्यांपूर्वीच ते सुट्टीवरून परतले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.