वेलिंग्टन, न्यूजीलंड : भारताकडून न्यूझीलंडमधले उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नीवर नोकराचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर थापर यांनी दूतावास सोडून भारत परण्याचा निर्णय घेतलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मे महिन्यात स्टाफ मेम्बरमध्ये सहभागी असलेल्या एका भारतीय आचार्यानं हा आरोप केला होता.
थापर आणि त्यांची पत्नी शर्मिला हे आपल्याला गुलामासारखी वागणूक देतात.... आपल्यासोबत मारहाण केली जाते... तसंच थापर यांच्याकडून जीवे मारण्याची धमकीही मिळाल्याची तक्रार या नोकरानं केली होती.
काही दिवसांपूर्वी एका रात्री थापर यांचा नोकर काही लोकांना जखमी अवस्थेत सापडला होता.... त्यानंतर त्यानं लोकांच्या मदतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. पण, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नोकरानं आरोपींवर लेखी गुन्हा दाखल करण्यास मात्र नकार दिला. शर्मिला यांच्यामुळे आपण कित्येक रात्री वेलिंग्टनच्या शेल्टर होममध्ये काढल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
न्यूझीलंडच्या एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वेलिंग्टन स्थित थापर यांच्या निवासस्थानाहून त्यांचं सामान ट्रकमध्ये लोड करून हलवण्यात येत होतं. यामुळे थापर यांनी दूतावास सोडल्याचं स्पष्ट होतंय. तक्रार दाखल झाल्यानंतर लाजेखातर भारत सरकारनं थापर यांना मायदेशी बोलावून घेतल्याचंही सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.