अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

Updated: Jun 27, 2015, 11:43 AM IST
अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता  title=

वॉशिंग्टन  : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

अमेरिकेसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. याआधी अमेरिकेत्या चौदा राज्यांमध्ये समलिंगी विवाहावर बंदी घालण्यात आली होती. 

कायद्याच्या नजरेतून समान प्रतिष्ठा मिळावी अशी मागणी, याचिकाकर्त्यांनी केली होती. त्याचा आदर करत घटना समलिंगी विवाहांना मान्यता देत असल्याचं, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. दरम्यान, समलिंगी विवाहांना परवाने कधीपर्यंत दिले जातील, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 


या ऐतिहासिक निर्णयानंतर सप्तरंगात रंगलेलं 'व्हाईट हाऊस'

न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये समलिंगी जोडप्यांनी एकच जल्लोष केला. तर हा निर्णय म्हणजे अमेरिकेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी, अमेरिकेत गेल्या दहा वर्षांहून जास्त काळ न्यायालयीन लढा सुरु होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.