स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा घटून 12,615 कोटींवर आला

स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

PTI | Updated: Jun 18, 2015, 05:51 PM IST
स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा घटून 12,615 कोटींवर आला title=

झुरीच,स्वित्झर्लंड : स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

भारत सरकारसह अन्य काही देशांनी स्विस बँकांमध्ये दडवण्यात येणाऱ्या काळ्या पैशाबाबत आक्रमक भूमिका घेत केलेल्या विरोधाला फळ येताना दिसत आहे. विशेष म्हणजे जगभरातून स्विस बँकेत येणारा पैशाचा ओघ वाढला असताना भारतीयांची पुंजी मात्र घटली आहे. 

स्विस बँकांमध्ये जगभरातल्या गुंकवणूकदारांनी ठेवलेली रक्कम या वर्षी ९० लाख कोटी रुपयांवरून वाढून १०३ लाख कोटी किंवा १.६० लाख कोटी डॉलर्स एवढी झाली आहे.

ताज्या माहितीनुसार, २०१४च्या अखेरीस भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेली एकूण रक्कम १७७६ दशलक्ष स्विस फ्रँक होती, जी एका वर्षापूर्वी १९५२ दशलक्ष स्विस फ्रँक होती. तर भारतीयांचा पैसा स्विस बँकेत ठेवणाऱ्या इतर वित्तसंस्थांची ठेवही या कालावधीत ७७.३ दशलक्ष स्विस फ्रँकवरून घसरून ३८ दशलक्ष स्विस फ्रँक एवढी झाल्याचं स्विस सेंट्रल बँकेनं जाहीर केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.