दाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म

`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 19, 2014, 01:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.
हरनाम कौर हिने डेली स्टारला सांगितले की, ती ११ वर्षांची होती तेव्हा तिच्या चेहरा, हात आणि छातीवर केस मोठ्या प्रमाणातवर उगत होते. त्यामुळे तिला लोक चिडवत होते. `बीयर्डो`, `शीमेल`, `शीमैन` सारख्या नावांनी तिला चिडविण्यात येत होते.
कौरने सांगितले की, लोकांच्या टोमण्यांनी आणि मस्करीने त्रस्त होऊन मी स्वतःला इजा करत होती. घरात स्वतःला लपवत होती. या व्याधीमुळे अनोळखी लोक मला विचित्र नजरेने पाहत असल्याने मला खूप त्रास होत असे.
१६ वर्षांची असताना मला शिख धर्म स्वीकारण्याची संधी मिळाली. शिख धर्मात केस कापण्यास बंदी आहे. सुरूवातील दाढी वाढविण्यामुळे त्याची कुटुंबियांनी तिला विरोध केला. कौर पहिल्याप्रमाणे होऊ शकणार नाही. देवानेच तिला असे बनविले असल्याचे लोक म्हणत आहे. आता या रुपात ती खूश देखील आहे. ती आता स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.