भारतीयांची भिस्त औषधांवर

 अँन्टी – बायोटिक औषधांच्या खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दहा वर्षात भारतात अँन्टी बायोटिक औषधांच्या विक्रीत जवळपास 62 टक्क्यांनी वाढ झालीय.  

Updated: Jul 17, 2014, 02:20 PM IST
भारतीयांची भिस्त औषधांवर title=

नवी दिल्ली :  अँन्टी – बायोटिक औषधांच्या खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दहा वर्षात भारतात अँन्टी बायोटिक औषधांच्या विक्रीत जवळपास 62 टक्क्यांनी वाढ झालीय.  

अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीनं केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, गेल्या दहा वर्षात संपूर्ण जगात अँन्टी – बायोटिक औषधांचा वापर जवळपास 36 टक्क्यांनी वाढलाय. 

‘ब्रिक्स’मध्ये सहभागी असलेल्या देशांमध्ये अँन्टी बायोटिक औषधांचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढल्याचंही समोर आलंय. यामध्ये, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका या देशांचा ‘ब्रिक्स’मध्ये समावेश होतो.   

भारतात 2001 साली आठ अरब युनिट अँन्टी बायोटिक औषधांच्या विक्रीची नोंद झाली होती ती 2010 साली 1219 अरब युनिटवर पोहचली होती.  

भारतात अँन्टी बायोटिक औषधांचा अनियंत्रित वापर होत असल्याच्या समस्या वांरवार जाणवतात. अशामध्ये अनेक लोक साधारण: समस्यांवरदेखील अँन्टी बायोटिक औषधं घेताना आढळतात. या औषधांची त्यांना खरं तर गरजही नसते. या औषधांच्या जास्तीत जास्त वापरामुळे त्यांचा परिणाम कमी होण्याचा धोका वर्तवला जातोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.