www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
न्यू यॉर्कहून नवी दिल्लीकडे उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान दिलेल्या जेवणात एका प्रवाशाला सॅण्डविचमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत.
"एअर इंडियाचे (एआय102)हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीकडे येत होते. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला देण्यात आलेल्या सॅण्डविचमध्ये आळ्या असल्याचे दिसले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर २८ सप्टेंबरला याप्रवाशाने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
मात्र, त्यावेळी त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. या घटनेचा आणखी पाठपुरावा केल्यानंतर सॅण्डविच बनविणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई केल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. आम्ही चांगल्या कंपनीकडून खाद्य पदार्थ घेत असतो. परंतु, ही चुकून घटना घडली आहे, यापुढे काळजी घेऊ, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.