ISIS मधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशदवाद्यांची हत्या

आयसिसने इराकमधील मोसूल शहरात संघर्ष क्षेत्रातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांना सार्वजनिक ठिकाणावर आणून सगळ्यांसमोर त्यांचे धड मानेपासून वेगळं केलं. आयसिस मधून पळून जाणाऱ्या लोकांना अशीच शिक्षा दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं.

Updated: Jan 31, 2016, 10:56 PM IST
ISIS मधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशदवाद्यांची हत्या title=

काहिरा : आयसिसने इराकमधील मोसूल शहरात संघर्ष क्षेत्रातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांना सार्वजनिक ठिकाणावर आणून सगळ्यांसमोर त्यांचे धड मानेपासून वेगळं केलं. आयसिस मधून पळून जाणाऱ्या लोकांना अशीच शिक्षा दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं.

आरा न्यूजच्या बातमीनुसार आयसिसने मोसूल शहरातून पळून जातांना या २२ जणांना पकडलं. आयसिस या संघटनेतून पळून जाणाऱ्या लोकांना हिच शिक्षा दिली जाणार असल्याचं जिहादीने आदेश दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अशा शेकडो लोकांची आयसिसनं सगळ्यांसमोर हत्या केली आहे. अशी माहिती काही वृत्तवाहिनींनी दिली आहे.