रमादी, इराक: इराकमधल्या रमादी शहरावर इसिस या दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवलाय. इथून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून गेलेत.
या शहरावर ताबा मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून इराकी फौजा आणि इसिसमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. गेल्या तीन दिवसांत ५००हून अधिक सैनिक आणि नागरिकांचे प्राण गेले असून रमादी शहरावर अखेर इसिसनं ताबा मिळवला आहे. गेल्या काही दिवसांत तेथून आठ हजार नागरिकांनी पलायन केलंय.
रमादी शहरात इसिसची सरशी होत असल्याचं वृत्त पसरताच आसपासच्या प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात शिया पंथाचे लढवय्ये इराकी फौजांना मदत करण्यासाठी तिथं जमा झालेत.
इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी सैनिकांना आपले मोर्चे न सोडता लढत राहण्याचं आवाहन केलंय. दरम्यान इसिसला नामोहरम करणारच असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.