तरुणींची व्हर्जिनिटी भंग होईल म्हणून...रेस स्पर्धेसाठी रोखले

ऑस्ट्रेलियातील एका इस्लामी कॉलेजने मुलींचे कौमार्यभंग (व्हर्जिनिटी) होईल म्हणून, त्यांना धावण्याच्या (रेस) स्पर्धेत भाग घेण्यापासून रोखण्यात आले आहे.

Updated: Apr 24, 2015, 04:32 PM IST
तरुणींची व्हर्जिनिटी भंग होईल म्हणून...रेस स्पर्धेसाठी रोखले title=

सिडनी : ऑस्ट्रेलियातील एका इस्लामी कॉलेजने मुलींचे कौमार्यभंग (व्हर्जिनिटी) होईल म्हणून, त्यांना धावण्याच्या (रेस) स्पर्धेत भाग घेण्यापासून रोखण्यात आले आहे.

'द ऐज' या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. एक स्कूल कमिटी मुलींना धावण्याच्या स्पर्धेत रोखण्यात आल्याने चौकशी करत आहे. दरम्यान, एका माजी शिक्षकाने शिक्षण मंत्र्यांना एक पत्र पाठविले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. या पत्रामुळे ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

या पत्रात असेही म्हटले आहे, मुली जास्त धावल्यात तर त्यांचे कौमार्यभंग पावण्याचा धोका आहे, असे प्राचार्य यांचे म्हणणे आहे. प्राचार्यांनी एक वैज्ञानिक कारण दिलेय. मुली फुटबॉल खेळताना त्यांना लागते. जखमी होतात. खेळताना पाय तुटला तर त्या प्रेग्नंट होऊ शकत नाही. त्यामुळे खेळण्यासाठी त्यांना मज्जाव करण्यात आल्याचे आरोप करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.