दहशतवादी संघटनेकडून जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद, व्हिडिओ जारी!

 इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनं ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा शिरच्छेद केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. 

Updated: Feb 2, 2015, 12:35 PM IST
दहशतवादी संघटनेकडून जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद, व्हिडिओ जारी! title=

अम्मान, जोर्डान: इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनं ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा शिरच्छेद केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. 

इस्लामिक स्टेटसंबंधी सहानुभूती असलेल्या काही व्यक्तीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. दरम्यान, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणाकडूनही दुजोरा देण्यात आला नाही.

#ISIS new video beheading of #KenjiGoto didn't mention the fate of #Jordanianpilot Mu’adh al-Kasasibah pic.twitter.com/YIscAOssSn

— Rita Katz (@Rita_Katz) January 31, 2015

शुक्रवारी जपानी ओलिस केंजी गोटोच्या आवाजातील नवीन संदेश जारी करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं जॉर्डनसाठी अल-काईदाशी संबंधित एका इराकी सदस्याची सुटका करण्यासाठीची मुदत वाढविली होती. इंग्रजीतील या संदेशात म्हटलं होतं की, जॉर्डननं सूर्यास्तापर्यंत तुर्की सीमेवर महिला अतिरेकी साजिदा अल-रिश्वीला मुक्त करावं, अन्यथा जॉर्डन वायुदलाचा वैमानिक मस-अल कसासबेहची हत्या केली जाईल. या वैमानिकाच्या सुटकेसाठी जॉर्डननं इस्लामिक स्टेटच्या एका सदस्याची सुटका करण्याची तयारी दाखविली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.