वॉशिंग्टन : isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.
अमेरिकेने आज मंगळवारी सीरियामध्ये सीरिया आणि वायव्य इराकमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा मोठा प्रभाव त्या भागावर संघटनेविरोधात हवाई हल्ले सुरु केलेत.
दरम्यान, इसिसच्या दहशतवाद्यांनी दोन अमेरिकन पत्रकारांचा निर्घृण शिरच्छेदही केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय आघाडीने दहशतवादविरोधी मोहीम सुरु केलेय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्यास इस्लामिक स्टेटविरोधात मोठी मोहीम सुरु करण्याची परवानगी दिली होती. सीरिया आणि वायव्य इराकमध्ये या दहशतवादी संघटनेचा प्रभाव असून या संघर्षात आत्तापर्यंत हजारो ठार झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.