मुंबई : भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये श्रीकृष्ण भक्त मोठ्य़ा प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये एका मुस्लीम देशाचा देखील समावेश आहे. जेछे आजच्या दिवशी सुट्टी असते.
ढाका शहरातील ढाकेश्वरी मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ढाकामध्ये या उत्सवाची सुरुवात १९०२ मध्ये झाली होती. 1948 मध्ये ढाका पाकिस्तानचा भाग बनला त्यानंतर त्यावर बंदी लावण्यात आली होती. जेव्हा बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला तेव्हापासून म्हणजेच 1989 नंतर हा उत्सव पुन्हा सुरु झाला.