जवानांच्या मृतदेहांची विटंबना, पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. मृतदेहांची विटंबना झाल्याच्या भारताच्या दाव्याचा पाकिस्ताननं साफ इन्कार केला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2017, 04:43 PM IST
जवानांच्या मृतदेहांची विटंबना, पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. मृतदेहांची विटंबना झाल्याच्या भारताच्या दाव्याचा पाकिस्ताननं साफ इन्कार केला आहे. 

सोमवारी पहाटे पाकिस्तानानं केलेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेनंतर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली. या चर्चेत आज भारतीय बाजूनं पाकिस्तानला त्यांच्या कृत्याचा जाब विचारण्यात आला.  पण पाकिस्ताननं असा कुठलाही प्रकार घडल्याचं नसल्याचं म्हटले आहे.

डीजीएमओस्तरीय चर्चे्यावेळी उलट नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचा पुरावा द्यावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली. दरम्यान आज बीएसएफच्या 200व्या बटालियनचे हेड कॉन्सेटबल प्रेमसागर आणि शिख रेजिमेंटचे नायब सुभेदार परमजीत सिंह यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले.

पंजाबमधल्या तरण तारणमध्ये परमजित सिहांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर प्रेमसागर यांच्या पार्थिवावरही लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.