एका आंदोलनासाठी सिडनीत ‘न्यूड स्वीमिंग स्पर्धा’

सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी एक अद्भूत आणि विचित्र स्पर्धा रंगली होती. शेकडो नागरिक नग्न होऊन स्वीमिंगच्या स्पर्धेत सामील झाले. नग्न व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने न्यूड स्वीमिंगचा त्यांनी एक विचित्र रेकॉर्ड बनवला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 24, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिडनी
सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी एक अद्भूत आणि विचित्र स्पर्धा रंगली होती. शेकडो नागरिक नग्न होऊन स्वीमिंगच्या स्पर्धेत सामील झाले. नग्न व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने न्यूड स्वीमिंगचा त्यांनी एक विचित्र रेकॉर्ड बनवला.
रविवारी शारीरिक बनावटासंदर्भात पूर्वाग्रह विचारांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारे नग्न स्वीमिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे.
गेल्या वर्षी यात ७५० जणांनी या सहभाग दर्शविला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय उद्यानांसाठी पैसे गोळा करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत मौजमस्ती करणाऱ्या स्पर्धकांनी समुद्र किनाऱ्यावर आपले कपडे उतरवले आणि ९०० मीटर न्यूड स्वीमिग केली.
काही जणांची आपल्या पाठीच्या खाली काही मेसेज लिहिला होता. न्यूज वेबसाईट डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार एका न्यूड स्पर्धकाने सांगितले की, आपण नग्नावस्थेत जन्माला आलो आहोत. आमच्या शरिराकडे कोण पाहतं ही चिंता नाही आम्ही एका चांगल्या कार्यासाठी असे करीत आहोत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.