www.24taas.com, इस्त्राईल
इस्राईलमधील मराठी भाषिकांनी २ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला. हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे इस्राईलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी चौ-मासिकातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानं यंदा रौप्य महोत्सव साजरा केला.
मायबोलीचे संपादक व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष नोहा मस्सील यांनी सर्वांचे स्वागत केले. ‘मराठी मायबोलीच्या परदेशांतील विकासाबद्दल प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे’ असं त्यांनी यावेळी म्हटलंय. इस्राएलमध्ये मराठीची सेवा व सहकार्य देणाऱ्यांना गौरवीत करून स्मृतीचिन्हं देण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमांत स्थानिक कलाकारांनी भाग घेतला होता. शेवटी येथील मराठी भाषिकांना प्रोत्साहित करून त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मुंबईहून खास आलेले बहुरूपी कलाकार केदार परुळेकर यांचा विनोद, विस्मय व काव्यरस भरीत कार्यक्रम, प्रोफेसर सुहास लेले यांच्या उचित निवेदनाने सादर केला. कार्यक्रमाचा शेवट भारत व इस्राएल यांची राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला.