'भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अणूयुद्ध'

अमेरिकेच्या दोन तज्ञांनी अमेरिकेच्या संसदेत धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून, भारताने जर पाकिस्तानवर लष्करी हल्ला केला. तर पाकिस्तान भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Feb 26, 2015, 08:11 PM IST
'भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अणूयुद्ध' title=

वॉशिग्टन : अमेरिकेच्या दोन तज्ञांनी अमेरिकेच्या संसदेत धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून, भारताने जर पाकिस्तानवर लष्करी हल्ला केला. तर पाकिस्तान भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

भारतातील सरकार सध्या बहुमतात आहे, मुंबई हल्ला सारखा हल्ला पुन्हा झाला तर भारतीय नागरिकांच्या दबावानंतर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध छेडलं जाण्याची शक्यता आहे, विशेष म्हणजे पाकिस्तानकडून अशा हल्ल्याची जास्त शक्यता आहे.

अमेरिकेतील या विषयाचे तज्ञ जॉर्ज पारकोविक आणि अश्ले टेलिसनने काल सुनावणी दरम्यान राजकीय बळावर सीनेटची सशस्त्र सेवा समिती आणि उपसमितीच्या सदस्यांना सांगितलं की, भारत-पाकिस्तानमधील हा संघर्ष टाळता येऊ शकतो, यासाठी इस्लामाबादशी समन्वय ठेऊन भारताच्या भूमीवर कोणताही मोठा हल्ला होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.