व्हिडिओ : मलालाही जाणते जादूचे खेळ!

पाकिस्तानची मुलगी आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजई हिलाही जादूचे खेळ येतात, असं सांगितलं तर... 

Updated: Sep 29, 2015, 01:53 PM IST
व्हिडिओ : मलालाही जाणते जादूचे खेळ! title=

मुंबई : पाकिस्तानची मुलगी आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजई हिलाही जादूचे खेळ येतात, असं सांगितलं तर... 

समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या मलाला युसूफझई हिला हातांची खेळी करूनही समोरच्याला थक्क करता येतंय. एका लाईव्ह शोमध्ये तिनं ही आपलं कसब सादर करून दाखवलंय. 

स्टेफन कोलबर्ट यांच्या 'द लेट शो विथ स्टेफन कोलबर्ट' या कार्यक्रमात तिनं पत्त्यांच्या काही ट्रीक्स करून दाखवल्यात.

मलाला ही केवळ १८ वर्षांची आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तालिबान्यांकडून गोळ्या खाणारी धीरगंभीर मलाला हिची विनोदबुद्धीही तितकीच तल्लखही आहे... पाहा...

व्हिडिओ पाहा :- 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.