लंडन : लिंग नसतांना ही शंभर महिलांशी संबंध ठेवले आहेत. यामुळेच अॅंड्र्यू वार्डले याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील येत आहे. डॉक्युमेंटरीचं नाव मॅन विथ नो पेनीस असं ठेवण्यात आलं आहे.
जन्म झाल्यानंतर ब्लॅडर एक्सट्रॉफीमुळे त्याचे ब्लॅडर हे शरीराबाहेर वाढले. डॉक्टरांनी यावर अनेक उपाय केले पण त्याचे लिंग हे कधीच वाढले नाही. असं असतांना देखील त्याने शंभर महिलांशी संबध ठेवले परंतु त्यांना त्याच्या या वैगुण्याबद्दल कधीच समजले नाही.
महिलांच्या शरीराबाबत आणि त्यांच्या मनाबाबत आपण खूप जागरूक होतो त्यामुळे माझ्यावर कधी लाजण्याचा प्रसंग आला नाही असं त्याने म्हटलं आहे. त्याच्या प्रेयसीला देखील त्याबद्दल माहित नव्हते परंतु जेव्हा त्याने एका शोमध्ये ही गोष्ट सांगितली तेव्हा तिला त्याबाबत समजलं. या डॉक्युमेंटरीमध्ये ते दोघे सोबत आपली हकीकत सांगणार आहेत. वार्डले आगामी काळात एक शस्त्रक्रिया करुन घेणार आहे. त्याला लिंग बसविण्यात येणार आहे.