चंद्रावर हे कोण फिरत आहे?

चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे. 

Reuters | Updated: Aug 14, 2014, 12:15 PM IST
चंद्रावर हे कोण फिरत आहे? title=

न्यूयॉर्क : चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे. 

एका मानवी आकृती आणि त्याची सावली चंद्रावर दिसून येत आहे. या छायाचित्राबाबत नासाने आपली शोध मोहीम सुरुच ठेवली आहे. अद्यापयाबाबत अधिकृत असे सांगण्यात आलेले नाही. मात्र, नासाने पाठविलेल्या छायाचित्राचा व्हिडिओ यूट्यूबवर अप करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा होत आहे की, चंद्रावर अनोळखी माणूस आहे. त्याची छाया दिसत आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून यूट्युबवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओवरुन एका व्यक्तीची सावली दिसत आहे. आतार्पंयत हा व्हिडिओ एका महिन्यात 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ऑस्ट्रेलियातील 9 न्यूजच्या दाव्यानुसार व्हिडिओ अप करणाऱ्या व्यक्तीने अन्य वेब ग्राहकांच्या माध्यमातून ऑनलाईन छायाचित्र पाहिल्यानंतर याबाबतची चौकशी सुरु केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.