मुंबई : एका लहान मुलाच्या हातात रक्तानं माखलेलं, धडावेगळं झालेलं शिर पाहायला मिळालं तर...
अंगावर शहारा आणणारी ही क्रूरता एका ‘आयएसआयएस’चा दहशतवाद्याच्या केवळ 7 वर्षांच्या मुलात दिसलीय. ऑस्ट्रेलियन मात्या-पित्याच्या या कोवळ्या मुलानं क्रूरतेची हद्द ओलांडलेली दिसतेय. या मुलाच्या पित्यानं इस्लाम धर्म स्वीकारला होता. खालेद शरौफ असं या पित्याचं नाव आहे. गेल्या वर्षी तो सीरियात पळून गेला होता.
आयएसआयएसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यानं सीरियाच्या लष्करातील एका जवानाचं मुंडकं धडावेगळं केलं... आणि त्यानं हे मुंडकं आपल्या 7 वर्षांच्या मुलाच्या हातात दिलं. मुलानंही मोठ्या मजेत हे रक्तानं बरबटलेलं शिर आपल्या हातात पकडून फोटो काढला. खालेदनं त्या फोटोवर लिहिलं ‘दॅटस् माय बॉय’ आणि हा फोटो ट्विटरवर शेअर केला.
हाच फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. या मुलाचा हा क्रूर कारनामा पाहून अनेक जण स्तब्ध झालेत. उदारवादी मुस्लिमांनाही या क्रूरतेनं धक्का बसलाय.
ऑस्ट्रेलियात खालेदच्या नावाचं अटक वॉरंट आहे. त्याच्यावर 2005 साली सिडली हल्ल्याची आखणी करण्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली त्यानं चार वर्ष कैदेत काढलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.