मेरीलँड : कॅरेबियन समुद्रातील पोर्टो रिको या छोट्याशा द्वीपसमूहावरील १९ वर्षांची स्टेफनी डेल वॅले हिने २०१६ची ‘विश्वसुंदरी' म्हणून मुकुट परिधान केला.
रविवारी रात्री येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘विश्वसुंदरी २०१६’ची स्टेफनी हिची निवड झाली. डॉमिनिकन रिपब्लिकची यारित्झा मिग्युलिना रेयेस रमिरेज आणि इंडोनेशियाची नताशा मॅन्युएला या अनुक्रमे ‘फर्स्ट रनर-अप’ व ‘सेकंड रनर-अप’ ठरल्या.
Miss World 2016 is...Stephanie Del Valle from Puerto Rico! pic.twitter.com/IIv7LqZAUi
— Miss World (@MissWorldLtd) December 18, 2016
१९५१ मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे ६६ वे वर्ष होते. येथील एमजीएम नॅशनल हार्बरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत परीक्षकांनी जगभरातील १०० हून अधिक स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.