www.24taas.com, पीटीआय, न्यूयॉर्क
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.
ग्रामीण महिला या शब्दावरून खुर्शिद यांनी न्यूयॉर्कमध्ये भाष्य केले. मोदी यांना त्यांनी लक्ष्य केले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या कथित टीकेवरून मोदींनी दिल्लीतील सभेत पंतप्रधानांची खिल्ली उडविली होती. त्याचा खुर्शिद यांनी समाचार घेतला.
मोदी हे केवळ बोलणारे पोपट आहेत, अशी टीका खुर्शिद यांनी केली. पीटीआय या सरकारी वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते. नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा ग्रामीण महिला असा उल्लेख केल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी प्रसिद्धीस दिले होते. ज्या पत्रकाराने ही बातमी प्रसिद्धीस दिली होती, त्याने नंतर शरीफ यांच्या अशा वक्तव्याचा इन्कार केला होता. त्यावर मोदी वस्तुस्थिती लक्षात न घेता टीका करत आहेत, असे मत खुर्शिद म्हणालेत.
ग्रामीण महिला, या शब्दात गैर असे काहीच नाही. मुळात ग्रामीण महिलेला आपण निंदात्मक का करावे ? कदाचित मोदींना ग्रामीण महिला आवडत नाही. अर्थात, मोदी वास्तवापासून खूपच दूर आहेत. त्यांनी शरीफ यांनी टीका केली की नाही, असा संभ्रम असताना मोदींनी त्यावरून पंतप्रधानांना लक्ष्य केले.
मोदींच्याभोवती काही अनुभव नसलेली माणसे आहेत. त्यांना भारतीय राजकारणाची जाण नाही. ते बाहेरचे राजकारण पाहता ते काही तरी लिहून देतात आणि मग मोदी ते पोपटासारखे बोलतात. असे सांगताना मोदींनी धर्मनिरपेक्ष व्हावे, असा सल्ला रर्शिद यांनी दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.