पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘धर्म’कार्याचं सत्य बाहेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘धर्मपुत्राची’ त्याच्या कुटुंबीयांशी घडवून आणलेली भेट काही दिवसांपूर्वी चर्चेत आली... खुद्द मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गोष्टीची केली गेलेली ‘जाहिरात’ म्हणजे बनवा-बनवी असल्याचं आता सोशल मीडियामुळेच उघडकीस आलीय.  

Updated: Aug 6, 2014, 12:03 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘धर्म’कार्याचं सत्य बाहेर...  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘धर्मपुत्राची’ त्याच्या कुटुंबीयांशी घडवून आणलेली भेट काही दिवसांपूर्वी चर्चेत आली... खुद्द मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गोष्टीची केली गेलेली ‘जाहिरात’ म्हणजे बनवा-बनवी असल्याचं आता सोशल मीडियामुळेच उघडकीस आलीय.  

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल वेबसाईट अकाऊंटवरून याची मोठी जाहीरात केली गेली. जीत त्याच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याचं सांगत मोदींनी आपला आनंद सोशल वेबसाईटवरून लोकांशी शेअर केला. पण, यातली खरी मेख म्हणजे नरेंद्र मोदींचा धर्मपुत्र जीत बहादूर आणि त्याच्या कुटुंबीयांची दोन वर्षांपूर्वीच भेट झालीय आणि तो त्यांच्या संपर्कातही आहे... 

अशी करून देण्यात आली होती मोदींच्या धर्मपुत्राची ओळख.... 
गरीबीमुळे कामाच्या शोधात लहान वयात जीत भारतात आला होता. मात्र, कुठेच काही काम मिळत नसल्यानं त्याने राजस्थाहून गोरखपूरसाठी रेल्वे पकडली. मात्र, जीत ज्या गाडीत बसला होता ती गाडी गुजरातला जाणारी होती. गुजरातला भटकत असताना एका महिलेची नजर जीतवर पडली. आणि त्या महिलेनच जीतची भेट १९९८ मध्ये नरेंद्र मोदींशी करून दिली आणि जीतच भाग्यचं बदललं. जीतच्या शिक्षणापासून ते राहण्या-खाण्यापर्यंतचा सर्व खर्च मोदींनी करून त्याला घडवलंय. काही वर्षापूर्वी जीत बाहदूर याच्या कुटुंबीयांना शोधण्यात आम्ही यशस्वी झालो ते त्याच्या तळपायाला असलेल्या सहा बोटांमुळे... ईश्वरच्या प्रार्थनेमुळेच १२ वर्षापूर्वी असाहय असलेल्या मुलाला आपण वाढवल्याचं मोदींनी ट्विटरवर सांगितलं होतं. 

काय आहे सत्य परिस्थिती... 
मोदींचा धर्मपुत्र म्हणून ओळख करून दिला गेलेला जीत बहादूर हा तरुण फेसबुकवर खूप अॅक्टिव्ह आहे... आणि दोन वर्षांपूर्वीच त्यानं आपल्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे फोटो इथं शेअर केलेत. 

ऑगस्ट 2012 मध्ये त्यानं आपले आणि नेपाळच्या नवलपारसी जिल्ह्यातील कुटुंबीयांचे काही फोटो शेअर केलेत. 19 जून 2012 रोजी त्यानं लिहिलंय... ‘हे फ्रेंडस्... आज मी खूप आनंदी आहे कारण मी घरी (नेपाळ) दाखल झालोय’...

आणि आता जीत बहादूरच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट घेऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत... हे स्क्रिनशॉट अनेक जणांनी शेअर करून नरेंद्र मोदींची ‘फेक’ जाहिरात उजेडात आणल्याचं म्हटलंय.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.