लंडन : एका आईने घराच्या बाहेर जाताना आपल्या मुलासाठी दरवाज्याला पिन लावून कंडोम टांगून ठेवला. कारण मुलाची गर्लफ्रेंड रात्री राहण्यासाठी येणार होती.
एका इंग्रजी संकेतस्थळाच्या बातमीनुसार, जरुरी कामासाठी बाहेर जाण्यासाठी या महिलेने आपल्या मुलासाठी एक कंडोम आणि त्यासोबत एक लेटर दरवाज्याला लटकावून ठेवले. पत्रात महिलांने लिहिले, बाळा मुला माहित आहे की तू आता मोठा झाला आहेस. याचा मला गर्व आहे. मात्र, तुम्ही मैत्रिण अॅश्ले घरी येणार आहे. ती रात्री राहणार आहे. त्यामुळे तू या कंडोमचा वापर करण्यास विसरु नकोस.
पत्राच्या मध्यभागी कंडोमचे पाकिट ठेवून त्यावर पिन लावला होता. या पत्रात तिने फ्रिजमध्ये जेवण ठेवल्याची आठवण करुन दिली. मात्र, दरवाज्यावर लटकवून ठेवलेल्या पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही युजर्सनी जागृत महिला म्हटले आहे. तर काहींनी खिल्ली उडवली आहे. एका युजरने म्हटलेय, कंडोमच्या मध्ये पिन लावली आहे. जेणे करुन कंडोमला होल पडेल.
तर दुसऱ्या एका युजरचे म्हणणे आहे की, या महिलेने कंडोमला जाणूनबुजन पिन लावून होल पाडलाय. जेणेकरुन याचा वापर होऊन मुलाच्या गर्लफ्रेंडकडून मुलाची अपेक्षा करीत आहे. मात्र, या लेटरचा फोटो कोणत्या ठिकाणचा आहे, याची माहिती मिळू शकलेले नाही. परंतु हा फोटो लंडनमधील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.