न्यूयॉर्क : अमेरिकेत राहात असलेल्या अमेरिकन इंडियन्सना मोदींचं भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे.. तीसुद्धा.. जगप्रसिद्ध मॅडीसन स्क्वेअरवर.. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत.
तेव्हा ते नवनिर्माण झालेल्या भव्य मॅडीसन स्क्वेअरवर अमेरिकन इंडियन्सना संबोधीत कऱणार आहेत. ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अमेरिकेतल्या संस्थेतर्फे नरेंद्र मोदींचं भव्य ऐतिहासिक स्वागत अमेरिकत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचं नाव असेल प्रधानमंत्री मा नरेंद्र मोदी अभिनंदन समारोह.. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान देशाबाहेर होत असलेलं हे सर्वात भव्य स्वागत असणार आहे. यावेळी मोदी मॅडीसन स्क्वेअर गार्डनवर प्रचंड मोठी सभा घेतील.
मॅडीसन स्क्वेअर गार्डन हे न्यूयॉर्कमधल्या मिडटाऊन मॅनहॅटनमधील भव्य इनडोअर अरेना आहे. त्याची कॅपॅसिटी २० हजारांची आहे. खरं म्हणजे ६० ते ८० हजारांची क्षमता असलेलं स्टेडीयम संस्था पाहात होती. पण त्यांनी मॅडीसन स्क्वेअर गार्डनशी कॉन्ट्रॅक्ट केलंय.
२८ सप्टेंबरला ही भव्य सभा होणार आहे. अमेरिकेत भारतीय कम्युनिटी प्रचंड आहे. अमेरिकेत २०१० च्या जनगणनेनुसार जवळपास २९ लाख भारतीय राहतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.