नेपाळने उचललं भारताविरोधात कठोर पाऊल

नेपाळने आज भारत विरोधी 2 कडक पाऊलं उचलली. भारत-नेपाळ सिमेवरील 13 भारतीय जवानांना घुसखोरीच्या आरोपखाली अटक केली. त्यांनतर देशातील 42 भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर मात्र भारतीय जवानांना सोडून देण्यात आलं. 

Updated: Nov 29, 2015, 04:11 PM IST
नेपाळने उचललं भारताविरोधात कठोर पाऊल title=

नवी दिल्ली : नेपाळने आज भारत विरोधी 2 कडक पाऊलं उचलली. भारत-नेपाळ सिमेवरील 13 भारतीय जवानांना घुसखोरीच्या आरोपखाली अटक केली. त्यांनतर देशातील 42 भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर मात्र भारतीय जवानांना सोडून देण्यात आलं. 

काठमाडूंतील सिनेमागृहांमध्ये चालणाऱ्या बॉलीबुडच्या सिनेमेही बंद पाडण्यात आले आहे. भारताकडून नेपाळला तेल आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंची निर्यात थांबवल्याने नेपाळने हे पाऊल उचल्याचं म्हटलं जातंय. 

नेपाळ केबल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाराजुली यांनी म्हटलं आहे की 'हा ब्लॅकआऊट अनिश्तिच काळापर्यंत आहे. भारताने नेपाळच्या सार्वभौमत्वात घुसखोरी केली. त्यामुळे आम्ही भारतीय वाहिन्यांचं प्रसारण बंद केलं आहे.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.