माल्टा : पाकिस्तान कुठल्याही पूर्व अटींशिवाय भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी दिले आहेत. पाकिस्तानची न्यूज चॅनेल जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
नवाझ शरिफ यांनी इंग्लंडचे पंतप्रधान डेविड कॅमेरून यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतासोबत चर्चेसाठीची तयारी शरीफ यांनी दाखवली.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारा सततचा गोळीबार आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन यामुळे दोन्ही देशांदरम्यान चर्चा होत नाहीये. ऑगस्टमध्येही दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक याच कारणामुळे रद्द झाली. दहशवादावर चर्चा हा भारताचा अजेंडा असून पाकिस्तान काश्मीरच्या मुद्य्यावर अडून आहे.
यावेळी शरीफ यांनी पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच आमचा देशही दहशवादामुळे पिडीत असून मी फ्रान्सच्या लोकांचे दु:ख समजू शकतो, असे शरीफ म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.