धक्कादायक, आयसिसचं जिहाद ऑलिम्पिक भरवलं...

आयसिस या दहशतवादी संघटनेनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. याच आयसिसनं जिहाद ऑलिम्पिक भरवत आणखी एक धक्का दिलाय. या ऑलिम्पिकचे काही फोटो प्रसिद्ध झालेत... 

Updated: Jul 12, 2016, 09:51 PM IST
धक्कादायक, आयसिसचं जिहाद ऑलिम्पिक भरवलं...  title=

तल अफर : आयसिस या दहशतवादी संघटनेनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. याच आयसिसनं जिहाद ऑलिम्पिक भरवत आणखी एक धक्का दिलाय. या ऑलिम्पिकचे काही फोटो प्रसिद्ध झालेत... 

इराकच्या तल अफरमधील हे फोटो पाहिले तर तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत... ही स्पर्धा भरली आहे ती जिहाद ऑलिम्पिकची.... आणि याचं आयोजन केलंय दहशतवादी संघटना आयसिसनं... 

आयसिसच्या दहशतवाद्यांनी यात लहान मुलांना रस्सीखेच आणि संगीत खुर्चीसारख्या खेळांमध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं.  त्याचप्रमाणे या खेळाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांनाही  आवाहन केलं होतं. 

आयसिसमध्ये कार्यरत असताना आपलं आयुष्य सुखासमाधानात आहे हे जगाला दाखवण्याचा हा प्रयत्न सुरु होता. आपल्या ताब्यात असलेल्या भागातले नागरिकही सर्वसामान्य आणि आनंदी जीवन जगत असल्याचं दाखवण्याचा आयसिसचा खटाटोप यातबव स्पष्ट होतोय. मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. 

आपल्या दहशतवादी कारवायांनी आयसिसनं संपूर्ण जगामध्ये दहशत माजवली आहे. त्यामुळे या ऑलिम्पिकचं आयोजन करून त्यांना यातून नेमका कोणता संदेश द्यायचाय ? आणि आगामी रियो ऑलिम्पिकसाठी ही धोक्याची सुचना आहे का.... असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय...