घटस्फोटासाठी 'त्यानं' चुकवलीय आत्तापर्यंतची सर्वांत मोठी किंमत...

घटस्फोट घेणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्रासदायकच ठरतो. पण, एखाद्या व्यक्तीला याच घटस्फोटासाठी किती किंमत मोजावी लागू शकते? १०० करोड,  २०० करोड, ३०० करोड... ५०० करोड...? उत्तर आहे... तब्बल ६१५९ करोड रुपये...

Updated: Nov 12, 2014, 05:07 PM IST
घटस्फोटासाठी 'त्यानं' चुकवलीय आत्तापर्यंतची सर्वांत मोठी किंमत... title=

नवी दिल्ली : घटस्फोट घेणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्रासदायकच ठरतो. पण, एखाद्या व्यक्तीला याच घटस्फोटासाठी किती किंमत मोजावी लागू शकते? १०० करोड,  २०० करोड, ३०० करोड... ५०० करोड...? उत्तर आहे... तब्बल ६१५९ करोड रुपये...

होय, अमेरिकेच्या एका बिझनेसमनला आपल्या पूर्व पत्नीला घटस्फोट देताना ६१५९ करोड रुपयांची पोटगी मिळालीय. कोर्टानंच तिच्या पतीला ही पोटगी देण्याचा आदेश दिलाय. 

अमेरिकेच्या एका कोर्टानं ६८ वर्षांच्या बिझनेसमन हेरॉल्ड हॅम यांना त्यांची पत्नी सुई एन हॅम यांना घटस्फोट देताना एक बिलियन डॉलर (म्हणजेच जवळपास ६१५९ करोड रुपये) पोटगी देण्याचे आदेश दिलेत. हा आत्तापर्यंत सर्वांत महागडा घटस्फोट म्हणून गणला जातोय. 

ओक्लाहोमा काऊंटीच्या न्यायाधीशांनी १० आठवडे सुरु असलेल्या सुनाणीनंतर हा आदेश दिलाय. 

हेरॉल्ड हॅम आणि सुई एन हॅम यांना दोन मुली आहेत. हे जोडपं १९८८ मध्ये विवाहबंधनात अडकलं होतं. 

ओक्लाहोमाच्या हेरॉल्ड हॅम यांनी १९६७ मध्ये तेल कंपनी ‘कॉन्टिनेंटल रिसोर्सेस इंक’ची स्थापना केली होती. सीईओ असलेल्या हॅम यांच्याकडे कंपनीचे ६८ टक्के शेअर्स आहेत. याची किंमत तब्बल १८ बिलियन डॉलर आहे. सुनावणी सुरु झाल्यानंतर आज याची किंमत १४ बिलियन डॉलर्सवर पोहचलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.