मित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये!

मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. 

Updated: Aug 30, 2014, 02:50 PM IST
मित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये! title=

मिसौरी, अमेरिका: मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मिसौरीच्या चेल्सी बेरी (24) आणि जेरेड प्रियर (28) यांच्यावर पार्थिव रस्त्यावर सोडल्याचा आरोप आहे. बेरीनं पोलिसांना सांगितलं की ते खूप नशेत होते आणि त्यांना भिती वाटली की, जर त्यांनी मृत डेनिस मेयर (30)ला हॉस्पिटलमध्ये नेलं तर ते फसतील. त्यांनी गाडी चालवली आणि पार्थिव रस्त्यावर सोडून ते फरार झाले. 

पोलिसांच्या मते मेयरचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतिसेवनानं झालाय. प्रेताचं पोस्टमार्टेम झालंय. मात्र अधिकाऱ्यांना टॉक्सिकोलॉजी रिपोर्टची वाट आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.