पाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी

पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान हे सांगितलयं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2012, 01:38 PM IST

www.24taas.com,इस्लामाबाद
पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान हे सांगितलयं. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर झरदारी यांच्याविरोधातले अनेक खटल्यांवरील सुनावणी बंद झालीये. ही सुनावणी आता सुरु होणार आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांना यापुढं सुनावणीसाठी कोर्टात येण्याची गरज नसल्याचंही यावेळी कोर्टाकडून सांगण्यात आलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी २५ सप्टेंबरला होणार आहे.