इस्लामाबाद : भारताकडून सचिव स्तरावरची चर्चा रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं यावर जळफळाट व्यक्त केलाय. पाकिस्तान म्हणजे भारताचा गुलाम नाही तर विवादीत काश्मीर भागाचा अधिकृत अधिकृत वाटेदार आहे, असं पाकिस्ताननं म्हटलंय.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या चर्चेसाठी भारतानं मनाई केल्यानंतरही पाकनं खोडसाळपणा करत हुर्रियत नेत्यांनाही चर्चेत सामील होण्यासाठी पाचारण केलं. त्यामुळे पाकिस्ताननं ही चर्चाच रद्द केली. त्यानंतरही पाकिस्ताननं काश्मीर विभाजनवादी नेत्यांसोबत चर्चा केली. भारताचं हे पाऊल पाकिस्तानला पचलेलं नाहीए.
यामुळे, नाराज झालेल्या पाकिस्ताननं उलट उत्तर देत ‘भारताला खूश करण्यासाठी त्यांच्या पद्धतीनं चालण्यासाठी पाकिस्तान काही भारताचा गुलाम नाही’ असं म्हटलंय.
पाकिस्तानचे परकीय विवाद प्रवक्ते तसनीम असलम यांनी काश्मीर हा भारताचा भाग नाही. ‘पाकिस्तानचे हाय कमिशनर अब्दुल बासित यांनी भारताच्या बाबतीत कानाडोळा केलेला नाही. काश्मीर हा भारताचा हिस्सा नाहीच’ असं असलम यांनी म्हटलंय.
‘पाकिस्तान काही भारताचा गुलाम नाही. हा एक स्वतंत्र देश आहे. काश्मीर एक विवादास्पद भूभाग आहे आणि या वादात पाकिस्तान एक अधिकृत वाटेदार आहे’ असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
असलम यांनी हा भारताचा दिखावा असल्याचं म्हटलंय. ‘हा तर केवळ वेळकाढूपणा आहे. ही काही पाकिस्तानचे हाय कमिशनर आणि हुर्रियत नेत्यांमध्ये भेट झाल्याची पहिली वेळ नाही. असं तर कित्येक वर्षांपासून होत आलंय’ असंही असलम यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.