नेदरलँड : आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे नियम धाब्यावर बसून बनावट सुनावणीच्या आधारे पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोप आज भारताना आंतरराष्ट्रीय कोर्टात केला आहे.
सध्या नेदरलँडमधल्या हेग या शहरात आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या ११ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
सुनावणी दरम्यान दोन्ही देशांना प्रत्येकी 90 मिनिटं युक्तीवाद करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारताची बाजू मांडण्यात येत आहे. त्यानंतर पाकिस्तानालही आपलं म्हणणं मांडता येईल. त्यानंतरच काय तो निर्णय होईल असं सुनावणी आधी मुख्य न्यायमुर्तीनी म्हटलं आहे.
पाहा लाईव्ह सुनावणी
#WATCH Arguments by India before International Court of Justice in Kulbhushan Jadhav case, in The Hague, Netherlands https://t.co/1d4En7XlJU
— ANI (@ANI_news) May 15, 2017