भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा

भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौकी उध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरु केलाय.

Updated: May 24, 2017, 06:56 PM IST
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा  title=

इस्लामाबाद : भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौकी उध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरु केलाय. भारतानं ९ मे रोजी हल्ला केल्यानंतर आपण प्रत्युत्तर म्हणून १३ मे रोजी भारतावर असाच हल्ला चढविला होता, असा व्हिडीओ पाकिस्तानच्या सैन्याच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालाय.

प्युनीटीव्ह फायर अॅसल्ट अशा गोंडस नावाखाली पाकिस्तान सैन्यानी आपली तथाकथीत मर्दुमकी व्हायरल केलीये. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफुर यांनी भारतावरील हल्ल्याची दर्पोक्ती केली.

सुमारे ८७ सेकंदाचा हा व्हिडिओ असून नौशेरा प्रांतातील भारतीय चौक्यांवरील हा हल्ला चढवल्याची माहिती देण्यात आलीय. जशास तसे प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानची भाषा ही भारतानं व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर करण्यात आलेला कांगावा असल्याचंच बोललं जातंय.

हा आहे पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेला व्हिडिओ