नवी दिल्ली : पाकिस्तानातील प्रसार माध्यमांमध्ये अतीक अहमद हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. हा पाकिस्तानी नेता भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे की, 'पाकिस्तान सोबत युद्ध झालं तर गोळ्या नाही मोजल्या जाणार.'
पाकिस्तानातील प्रसार माध्यमं दावा करत आहे की, अहमद खान २४ नोव्हेंबरला नियंत्रण रेषेकडे कूच करणार आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये घुसून भारतीय अत्याचारांचा ते खुलासा करणार असल्याचं पाकिस्तानी मीडिया प्रसार करतंय. भारतीय सीमारेषेत जर घुसण्याचा जर प्रयत्न झाला तर भारतीय लष्कर हे शांत बसणार नाहीत. त्यांना उत्तर दिलं जाईल.
पाकिस्तान यावेळी काश्मीरमधील मुद्द्यांवर भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पण दहशतवादाच्या मुद्द्यावर शांत बसला आहे. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यूएनमध्ये दिलेल्या भाषणात म्हटलं होतं की, "काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग आहे आणि तो तसाच राहणार. यावर कोणतीच चर्चा नाही केली जाणार.'