भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

PTI | Updated: Sep 30, 2016, 02:39 PM IST
भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन title=

इस्लामाबाद : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

भारतीय लष्कराने LOCमध्ये घूसून 38 दहशतवादी ठार केलेत. तसेच 7 दहशतवादी कॅम्प उद्धवस्त केले. मात्र, पाकिस्तानने दावा केला की, भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर पाकिस्तानी जवानानी गोळीबार केला. यात भारताचे दोन जवान मारले. तसेच सात जवान जखमी झालेत. दरम्यान, पाकिस्तान हद्दीत चुकून गेलेल्या जवानाला आम्ही जीवंत पकडल्याचा दावा केलाय. मात्र, भारताने याचा इन्कार केलाय.

भारत-पाकिस्तानच्या संबंधाबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दोन वेळा अमेरिकेतून दूरध्वनी आले. यावेळी भारताच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 5 ऑक्टोबरला संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे. तसेच पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावले यांना समन्सही बजावले आहेत.