पाक पत्रकार हमीद मीर यांच्यावर गोळीबार

पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून गोळाबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2014, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कराची
पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून गोळाबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीर हे जियो वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. ते आपल्या कार्यालयात जात असताना काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मीर यांच्या शरीराच्या खालच्या भागात दोन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मीर हे पाकिस्तानमधील धडाडीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते इंग्रजी , उर्दू , हिंदी आणि बंगाली भाषांतील स्तंभलेखक म्हणूनही प्रसिद्धच आहेत. त्यांची प्रसिद्धी मोठी असल्याने त्यांच्याभोवती एखाद्या चित्रपट नायकाप्रमाणे वलय आहे. पाकिस्तानी सरकारच्या अनेक निर्णयांना विरोध दर्शविल्यामुळेसुद्धा ते नेहमी चर्चेत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.