पेशावर : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी अमानवीय पद्धतीनं लहान-लहान चिमुरड्यांवर गोळीबार केला त्या राक्षसांचे फोटो आता समोर आलेत.
पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका सैनिकी शाळेवर अतिशय क्रूर पद्धतीनं करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या आणखी ७ लोकांनी बुधवारी आपले प्राण सोडलेत. त्यामुळे, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बळींची संख्या आता १४८ वर पोहचलीय. हा हल्ला घडवून आणणाऱ्या आत्मघातकी दहशतवाद्यांचे फोटो तालिबाननं जाहीर केलेत.
या फोटोत हे सातही दशतवादी आपापल्या हत्यारांसह आणि बंदुकीसह दिसतायत. १६ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर तालिबानचा प्रवक्त मोहम्मद खुरासानी यानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, हे कृत्यं योग्यच असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानी लष्कर गेल्या कित्येक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुटुंबांना आपला निशाणा बनवत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.