पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. 

Updated: Jan 2, 2016, 05:20 PM IST
पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल title=

लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. 

मुनीर अहमद नावाच्या एका व्यक्तीनं मोदींच्या या दौऱ्याविरुद्ध याचिका दाखल केलीय. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय नरेंद्र मोदी आपल्या फौजफाट्यासह पाकिस्तानात घुसले होते, असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. 

लाहोर दरम्यानवेळी मोदींसोबत १२० लोकांचा ताफा होता. मुनीर यांच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानं पाकिस्तानचे सगळे कायदे धाब्यावर बसवत पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली, असा त्यांचा आरोप आहे. 

या प्रकरणात पाकिस्तान सरकार, सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय.