हे तर क्रूरतेचं विवेकहीन कृत्य - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानचे समकक्ष नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानात पेशावरच्या एका सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केलीय.   

Updated: Dec 17, 2014, 11:40 AM IST
हे तर क्रूरतेचं विवेकहीन कृत्य - पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानचे समकक्ष नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानात पेशावरच्या एका सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केलीय. 

तसंच, अशा कठिण प्रसंगी भारत नेहमीच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्या शेजारील देशासोबत संपूर्ण ताकदीनं उभा राहील, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 

शरीफ यांच्यासोबत झालेल्या या संभाषणाबद्दल मोदींनी ट्विटरवर माहिती दिलीय. दहशतवादावर एकजुटता दाखवून दोन मिनिटं मौन पाळण्याचं अपीलही त्यांनी भारतातील शाळांना केलं.

पेशावरइथल्या वरसाक रोडस्थित आर्मी शाळेत मंगळवारी दहशतवाद्यांनी धुडगूस घातला. या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोरांना स्वत:ला उडवण्याआधी शाळेतील चिमुरड्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. ‘आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या सर्वच लोकांप्रति माझ्या संवेदना आहेत. आम्ही त्यांची पीडा समजू शकतो’ असं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय. शिवाय, ‘पेशावरच्या एका शाळेत घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याची आम्ही निंदा करतोय. हे कृत्य अकथनीय क्ररतेचं विवेकहीन कृत्य आहे... ज्यामध्ये छोट्या छोट्या मुलांची त्यांच्या शाळेतच हत्या करण्यात आलीय’ असंही मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.