लंडन : शनिवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते.
१०, किंग हेन्रीज... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्यानं पावन झालेली लंडनमधली ही वास्तू... १९२१-२२ च्या दरम्यान डॉ. आंबेडकर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिकत असताना याच घरात राहत होते. २०५० स्केअर फूटांचा हा तीन मजल्यांचा बंगला आहे. भारतानं दोन महिन्यांपूर्वीच या बंगल्याचा ताबा मिळवला होता.
अधिक वाचा - मोदी भेटले इंग्लडच्या राणीला
मोदींनी या स्मारकाचं उद्घाटन केलं आणि दलितांच्या या दिग्गज नेत्याचा समानता आणि न्यायाचा संदेश आजही प्रासंगिक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक वाचा - दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी
हे स्मारक 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय' या नावाने ओळखलं जाणार आहे. बाबासाहेबाचे काही दस्तावेज आणि पत्र या संग्रहालयात ठेवले जाणार आहे. यामध्ये, त्यांच्या काही लेखांचाही समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.