भारत केवळ मोठी बाजार नाही तर मोठी सत्ता, मोदींची यूएईत गर्जना

भारत आणि यूएई यांनी एकत्र आल्यास स्वप्न साकार होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

Updated: Aug 17, 2015, 01:28 PM IST
भारत केवळ मोठी बाजार नाही तर मोठी सत्ता, मोदींची यूएईत गर्जना title=

मसजर : भारत आणि यूएई यांनी एकत्र आल्यास स्वप्न साकार होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

यूएई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईमधील प्रसिद्ध आणि स्वप्नांचं शहर अशी ओळख असणाऱ्या मसदर शहराला भेट दिली. मसदरमध्ये पंतप्रधानांचं आगमन होताच सारा परिसर मोदी-मोदीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. मोदींनी इथल्या सौर कारमध्ये बसून त्याची पाहणी केली. तसंच मोदींनी इथं डिजिटल संदेशही लिहीला. यानंतर मोदींनी मसदरमधल्या व्यापाऱ्य़ांशीही चर्चा केली.

मसदरमध्ये व्यापाऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी एकविसाव्या शतक हे आशियासाठी सर्वात महत्त्वाचं शतक ठरणार आहे. भारत हा शक्यतांनी भरलेला देश आहे. भारत केवळ मोठी बाजार नाही तर मोठी सत्ता आहे... असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दुबईतल्या व्यापाऱ्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आवाहन केलंय. तसंच भारतातील श्रमिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण भारताच्या वाणिज्य मंत्र्यांना यूएईमध्ये पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

भारतात रियल इस्टेट आणि व्यापार क्षेत्रात अनेक संधी असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. आपल्या कामात अडथळे आणि अडचणी कायम आल्यात तरीही सरकारनं काही चांगले निर्णय घेतल्याचं मोदींनी सांगितलं. मोदींच्या या मसदर दौऱ्याकडे साऱ्यांचं विशेष लक्ष होतं. कारण 'झीरो कार्बन सिटी' आणि 'सौर ऊर्जेवर चालणारं शहर' म्हणूनही मसदर शहराला ओळखलं जातं. इथं  स्वच्छ भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा या शहराचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुबईच्या भव्य स्टेडियमध्ये त्यांचं भाषण होणार आहे. यावेळी जवळपास ४० हजार भारतीय यावेळी उपस्थित राहणार आहेत. संसदेत पावसाळी अधिवेशनाचा बट्याबोळ झाल्यावर पंतप्रधान मोदींचं प्रथमच जाहीर भाषण करणार आहेत. त्यामुळे याभाषणात ते नेमकं काय बोलतात याचं फक्त दुबईतल्या नव्हे साऱ्या भारतातल्या राजकीय धुरिणांचं लक्ष लागून राहिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.