नेपाळमध्ये मोदींनी केलं ट्रामा सेंटरचं उद्घाटन, दिले अनेक गिफ्ट्स

सार्कच्या १८ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी ट्रॉमा सेंटरचं उद्घाटन केलं. या सेंटरमधील अत्याधुनिक प्रणाली ही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली आहे. तसंच नेपाळच्या मुलभूत गरजांपैकी असणाऱ्या वीज आणि रस्ते याबाबतही पंतप्रधान मोदींचं भाषण नेपाळसाठी आशादायी आहे. 

Updated: Nov 25, 2014, 06:46 PM IST
नेपाळमध्ये मोदींनी केलं ट्रामा सेंटरचं उद्घाटन, दिले अनेक गिफ्ट्स title=

काठमांडू: सार्कच्या १८ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी ट्रॉमा सेंटरचं उद्घाटन केलं. या सेंटरमधील अत्याधुनिक प्रणाली ही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली आहे. तसंच नेपाळच्या मुलभूत गरजांपैकी असणाऱ्या वीज आणि रस्ते याबाबतही पंतप्रधान मोदींचं भाषण नेपाळसाठी आशादायी आहे. 

उद्घाटनादरम्यान मोदींनी दिल्ली ते काठमांडू बस सेवा सुरु करणार असल्याचं सांगितलं. तसंच ही बससेवा वाय-फाय युक्त असणार आहे असंही मोदींनी सांगितलं. त्याचप्रमाणे भारत नेपाळला एक मिलियन म्हणजेच दहा हजार कोटी नेपाळी रुपये कमी व्याज दरात देणार असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे भारतीय बनावटीचं धुव हे हॅलिकॉप्टर नेपाळला समर्पित करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

शेत जमिनीत कोणतं पिक चांगलं येऊ शकतं याची माहिती देण्यासाठी सॉइल टेस्ट मोबाईल व्हॅनही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली. नेपाळमधून भारतात नोकरी करता येणारे अनेक लोक आहेत त्यांना हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटा आणण्यावर असलेले निर्बंध हटवून ती मर्यादा २५,००० इतकी केली असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच संपर्क साधणं स्वस्त व्हावं म्हणून भारत ३५ % दर कपात करणार असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं असून नेपाळच्या दूरध्वनी विभागाला दर कमी करण्याची विनंती केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.